शिवसेनेचा 53 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

49

सामना ऑनलाईन । मुंबई

शिवसेनेचा 53 वा वर्धापन दिन राज्यभरात उत्साहाने साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी विविध उपक्रम राबवून वर्धापन दिन खास करण्यात आला. पंढरपूरमध्ये शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन आणि प्रा.डॉ. तानाजी सावंत यांची राज्याच्या कॅबिनेट मंत्रीमंडळात नियुक्ती झाल्याबद्दल पंढरपूर शहर शिवसेनेच्यावतीने आज दैनिक सामनाचे प्रतिनिधी सुनील उंबरे यांच्या हस्ते वारकरी भाविकांना जिलेबी वाटप करण्यात आली. या प्रसंगी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक संजय घोडके, महिला आघाडी शहर प्रमुख पूर्वा पांढरे, तालुका प्रमुख संगीता पवार आदी उपस्थित होते.

घनसावंगी, पारधमध्ये वर्धापन दिनाचा उत्साह
जालना – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कल्पनेतुन व अथक परिश्रमातुन स्थापन झालेल्या व महाराष्ट्रभर लोकाभिमुख काम करणाऱ्या शिवसेनेचा 53 वा वर्धापन दिन घनसावंगी येथे साजरा करण्यात आला. घनसावंगी येथील सहसंपर्कप्रमुख डॉ. हिकमत उढाण यांच्या जनसंपर्क कार्यालयात वर्धापन उत्साहात साजरा करण्यात आला. भोकरदन तालुक्यातील पारध येथेही शिवसेनेचा वर्धापण दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.

ghansavangi

वृक्षारोपण करून शिवसैनिकांनी साजरा केला वर्धापन दिन
पणजी – शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसैनिकांनी बार्देश तालुक्यातील कोलवाळ येथे महामार्गा लगत वृक्षारोपण केले. गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांच्या हस्ते वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात आली. सुमारे 10 ‘रेन ट्री’ लागवड करण्यात आली. गोव्याची नैसर्गिक संपदा अबाधित ठेवण्याच्या संकल्पनेतून खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न शिवसैनिकांतर्फे करण्यात येत असल्याचे जितेश कामत यांनी उपस्थितांना सांगितले.

panji

आपली प्रतिक्रिया द्या