Live – उद्धव ठाकरे यांच्या नावावर आमच्या सर्वांची सहमती- शरद पवार

3863
sharad-pawar

महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून शिवसेनेसोबत काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक सुरू आहे. वरळीतील नेहरू सेंटरमध्ये ही बैठक सुरू आहे. या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेतले जातील.

 • जेव्हा सर्व मुद्द्यांवर सविस्तर आणि संपूर्ण चर्चा संपन्न होईल, तेव्हा पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात येईल- पृथ्वीराज चव्हाण
 • मात्र, अद्याप चर्चा पूर्ण झालेली नाही, त्यामुळे उद्याही चर्चा सुरू राहणार- पृथ्वीराज चव्हाण
 • सर्व मुद्द्यांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली आहे.
 • महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू आहे- पृथ्वीराज चव्हाण
 • काँग्रेस राष्ट्रवादीची संयुक्त पत्रकार परिषद सुरू
 • तिन्ही पक्षांची एकत्रित पत्रकार परिषद शनिवारी होणार.
 • उद्धव ठाकरे यांच्या नावावर आमच्या सर्वांची सहमती- शरद पवार
 • तेव्हा तिन्ही पक्ष मिळून एकत्र येऊ तेव्हा सगळी माहिती देऊ- उद्धव ठाकरे
 • सर्व मुद्द्यांवर एकमत करून मगच जनतेसमोर जायचं असं ठरवलं आहे.- उद्धव ठाकरे
 • चर्चा अद्याप सुरू आहे. तिन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते एकत्र बसून आम्ही चर्चा केली आहे.
 • मला आता अर्धवट माहिती द्यायची नाही. तिन्ही पक्ष मिळून एकत्र येऊ तेव्हा सगळी माहिती देऊ- उद्धव ठाकरे
 • मला खात्री आहे की, ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे, लवकरात लवकर आम्ही तुमच्या समोर येऊ.
 • बऱ्याचशा गोष्टी सुटलेल्या आहेत, जे काही बारकावे बाकी आहेत, त्यावर चर्चा सुरू आहे.
 • शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक झालेली आहे. बैठक अतिशय समाधानकारक असून अद्याप सुरू आहे. – उद्धव ठाकरे
 • सव्वा दोन तासांनंतर बैठक संपली आहे.
 • सत्तास्थापनेसाठी निर्णायक बैठक संपली
 • बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेण्याची शक्यता
 • शिवसेनेसोबतच्या आघाडीच्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा
 • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे देखील बैठकीसाठी पोहोचले
 • काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान देखील उपस्थित
 • काँग्रेसचे नेते अहमद पटेल बैठकस्थळी पोहोचले
 • बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार उपस्थित
 • वरळीतील नेहरू सेंटरमध्ये शिवसेना नेते सुभाष देसाई, एकनाथ शिंदे पोहोचले
 • शिवसेना नेते खासदार संजय राऊत बैठकीसाठी पोहोचले

आपली प्रतिक्रिया द्या