
चेंबूर पांजरापोळ येथे 16 मार्च रोजी शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात येणार आहे. शिवसेना विभाग क्र. 9 आणि शिव स्मारक समितीच्या वतीने या सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या सोहळय़ाच्या निमित्ताने चेंबूर पांजरपोळ येथे हिंदू संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळय़ाला यावेळी मान्यवर अभिवादन करणार आहेत. यावेळी ढोलताशा, लेझीम, ऐतिहासिक साहसी खेळही सादर केले जाणार आहेत. शिवस्मारक समिती सचिव उपनेते सुबोध आचार्य, विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा आयोजित केला जाणार आहे.