शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण

1017

शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह कुटुंबातील चार सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांना शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. शहराचा मध्य भाग असलेल्या चितळे रोड, नेता सुभाष चौक परिसरातही कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. याच परिसरात राठोड यांचे संपर्क कार्यालय आहे.

राठोड यांना त्रास जाणवत असल्याने रविवारी त्यांनी घशातील स्त्राव तपासणीसाठी दिले होते. राठोड यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा व सून अशा चौघांचा अहवाल पॉझिटीव्ह आढळल्याने त्यांना उपचारासाठी एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या