शिवसेना महिला आघाडीचा स्तुत्य उपक्रम, 200 विधवा व निराधार महिलांचा केला सन्मान

1129

ऐन तारूण्यात अपघाताने किंवा आजारपणाने पतीची साथ सुटल्याने खचून न जाता संषर्घाचा विढा उचलत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत संघर्ष करणार्‍या विधवा रणरागिणींचा सन्मान करण्याचा कार्यक्रम बीड महिला आघाडीने आयोजित केला. संघर्षमय जीवन जगणाऱ्या 200 विधवा व निराधार महिलांसह मुली जन्म देणार्‍या 51 मातेंचा सन्मान करण्यात आला.

shiv-sena

शिवजयंती व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून बीड जिल्ह्यातील निराधार महिलांचा साडी चोळी, अनाथ मुला-मुलींना शालेय साहित्य वाटप, जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार व कन्या रत्न देणार्‍या मातेचा भव्यदिव्य कार्यक्रम सपन्न झाला. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख आनंद जाधव, महिला संपर्क प्रमुख संपदाताई गडकरी, नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर, सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे, जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, जिल्हा प्रमुख सचिन मुळुक, युवासेना जिल्हाधिकारी सागर बहिर, माजी जिल्हा प्रमुख बाळासाहेब पिगंळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या