शिवसेना आमदारांची आज बैठक!

874

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच सुटला असून शुक्रवारी काँग्रेस-राष्ट्रवादीची शिवसेनेशी निर्णायक चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची शुक्रवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी सकाळी 10.30 वाजता महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत.

दिल्लीतील राजकीय घडामोडीनंतर राज्यात सत्तास्थापनेबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीचे एकमत झाले आहे. शुक्रवारी या दोन पक्षांच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर ते शिवसेनेशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांची बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

ठाणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर नरेश म्हस्के तसेच उपमहापौर पल्लवी कदम यांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात  झालेल्या सोहळ्यात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या