
शिवसेनेचे आठ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असून बुधवारी रात्री ठाण्यात त्यांची गुप्त बैठक झाल्याचे खोडसाळ वृत्त एका दैनिकात छापून आले आहे. यामध्ये काही खासदारांची नावेही नमूद केल्याने आज राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र, हे वृत्त शिवसेनेच्या खासदारांनी फेटाळून लावले. शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना खासदारांची भूमिका मांडली. ‘आम्ही विकले जाणारे नाही,’ अशा शब्दांत त्यांनी खोडसाळ वृत्त पसवणाऱयांना ठणकावले. खोटी बातमी देणाऱया दैनिकाविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार, असे त्यांनी सांगितले. खासदार राजाभाऊ वाजे यांनीही, ‘मी कुणाच्याही संपका&त नाही, मी आज आणि उद्याही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबतच राहणार,’ असे निक्षून सांगितले.

























































