अहिल्यानगरमधील शिवसेना पदाधिकारी जाहीर; शशिकांत गाडे लोकसभा संघटक, तर राजेंद्र दळवी जिल्हाप्रमुखपदी, किरण काळे महानगरप्रमुख

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर जिह्यातील  शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

शशिकांत गाडे यांची अहिल्यानगर दक्षिण लोकसभा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुखपदी राजेंद्र दळवी (पारनेर, श्रीगोंदा, शेवगाव, कर्जत-जामखेड, राहुरी) आणि किरण काळे यांच्याकडे (अहिल्यानगर मनपा, अहिल्यानगर विधानसभा) महानगरप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

रावजी नांगरे उपजिल्हाप्रमुख (कर्जत-जामखेड-शेवगाव), गिरीश जाधव उपजिल्हाप्रमुख (नगर शहर), दीपक भोसले उपजिल्हाप्रमुख (राहुरी, श्रीगोंदा), तर मनोज गुंदेचा (पारनेर शहर) यांची उपशहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.