मुंबई-कोल्हापूर विमानसेवेसाठी शिवसेनेचे ‘होमहवन ’ आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर

सहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबई-कोल्हापूर अशी कशीबशी सुरू असलेली विमानसेवा अचानक बंद पडली, तर ‘उडाण योजनें’तर्गत सुरू होणारी कोल्हापूर-हैदराबाद ही विमानसेवाही सुरू होण्यापूर्वीच बंद पडण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे विमानतळाच्या जागेत होमहवन आणि मांत्रिकाकरवी भूतबाधा भागविण्यासाठी शिवसेनेने चपराकात्मक आंदोलन केले.

यावेळी जिह्यातील नेत्यांनी श्रेयवाद बाजूला ठेवून प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करावी, अन्यथा या नेत्यांविरोधात शिवसेना आंदोलनासाठी सज्ज असल्याचा इशारा देण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.