​देवणी : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेचा रास्ता रोको

29

सामना प्रतिनिधी । लातूर

देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना तत्काळ पिकविम्याची रक्कम वाटप करण्यात यावी या आणि इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने देवणी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सन २०१७-१८ चा पिकविमा तत्काळ वाटप करावा, घोषित करण्यात आलेल्या कर्जमाफीची यादी जाहीर करुन शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध करुन देण्यात यावी. तूर व हरभऱ्याचे जाहीर करण्यात आलेले अनुदान त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे, ऑनलाईनपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मंजूर करुन दिली जावी, ग्रामिण भागातील जलयुक्त शिवाराप्रमाणे चालू असणारी कामे शहरी महसूल भागातही सुरू करण्यात यावीत आदी मागण्यांसाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत देवणी व परिसरातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

आपली प्रतिक्रिया द्या