कोरोनाच्या लढ्यात पंतप्रधान मोदी आमचे सेनापती, हे युद्ध जिंकूच – संजय राऊत

19425

कोरोना विरुद्धच्या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचे सेनापती आहेत, अशा स्पष्ट शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या दरम्यान आपली भूमिका मांडली. तसेच ‘कोरोना विरुद्धच्या या लढाईत आम्ही ही एकत्र लढू आणि जिंकू’, असा विश्वासही त्यांनी या बैठकीदरम्यान व्यक्त केला. कोरोनाग्रस्तांची देशातील वाढलेली संख्या लक्षात घेता येत्या काळात लॉकडाऊन आणखी काही काळापर्यंत वाढवण्यात येण्यात असल्याचे संकेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. मात्र या आधी ते सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देशातील खासदारांसोबत बोलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी एक व्हिडीओ कॉन्फरन्स बोलवेळी होती. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग नंतर संजय राऊत यांनी वृत्तवाहिन्यांची बोलताना आपली भूमिका स्पष्ट शब्दात मांडली. तसेच तबलिगी जमातीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी राष्ट्रहितासाठी म्हणून समोर येऊन स्वतःहून तपासणी करुन घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात योग्य ताळमेळ असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एकत्र लढून आपण ही लढाई जिंकूच असा विश्वास त्यांनी पुन्हा व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या