सावरकरांचा सन्मान व्हायलाच हवा, तिथे तडजोड नाही, शिवसेनेने ठणकावले

897

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून देशभरात प्रतिक्रिया व्यक्त होत असताना शिवसेनेनेही ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान व्हायलाच हवा. तिथे तडजोड नाही’, अशा शब्दांत ठणकावले आहे.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी खडे बोल सुनावले आहेत. आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो. तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका असे बजावतानाच खासदार संजय राऊत म्हणाले, वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नाही, तर देशाचे दैवत आहेत. सावरकर या नावातच राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. पंडित नेहरू, महात्मा गांधी यांच्याप्रमाणेच वीर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाही.

आपली प्रतिक्रिया द्या