
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 10 मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. माहिम विधानसभेच्या विधानसभा निरीक्षकपदी यशवंत विचले यांची तर शाखा क्र. 177 च्या शाखाप्रमुखपदी जिनेश भेदा यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.