
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती झाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चिपळूण शहरात शिवसेना उद्धव नेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तुम आगे बढो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तुम आगे बढो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीची घोषणा झाल्यानंतर चिपळूण येथे शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत शिवसेना आणि मनसे पदाधिकारी, मनसैनिक व शिवसैनिकांनी एकत्र येत जल्लोष केला.
































































