
राज्यात महापालिका निवडणुका झाल्या असून आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीमुळे वातावरण तापत आहे. तसेच मुंबईसह अनेक शहराच्या महापौरपदाबाबत राजकारणात चर्चा होत आहे. त्यातच आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी एक व्हायरल व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. त्यात राहुल ढिकले आणि गिरीश महाजन यांच्यातील संवादामुळे साने निवडून आला, असे महाजन सांगत आहेत. मुसलमानांच्या मतामुळे भाजप जागा मिळवत असल्याचे या संवादातून स्पष्ट झाले आहे. या व्हायरल क्लिपमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. मुस्लीम मतांवर जागा मिळवणारे आम्हाला हिंदुत्व शिकवणार, असा शब्दांत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.
(आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार)
राहुल ढिकले- साने निवडून आला महंजे अवघड आहे
तुमची कृपागिरीश महाजन: मुसलमानांना मुळे झाला *चिपड्या* बोला साहब आपको पॅनल नही निकाल के दिया तो मुझे जेल मे डाल देना काय महंतो/ अगर मैंने तुमको वोटिंग निकाल के नहीं दिया तो
आमदार बाई भेटू देत नवती pic.twitter.com/0Dp0kzYryw
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 20, 2026
संजय राऊत यांनी एक्सवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात या दोघांमधील संवादही लिहिण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, (आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार) राहुल ढिकले म्हणत आहेत साने निवडून आला महंजे अवघड आहे, तुमची कृपा त्यावर गिरीश महाजन म्हणतात मुसलमानांनामुळे झाला *चिपड्या* बोला साहब आपको पॅनल नही निकाल के दिया तो मुझे जेल मे डाल देना काय महंतो/ अगर मैंने तुमको वोटिंग निकाल के नहीं दिया तो…आमदार बाई भेटू देत नवती, असे महाजन सांगत आहे. या व्हायरल क्लिपची राजकारणात चर्चा होत आहे.






























































