शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा राहुल गांधी सोबतचा एक खोटा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोविरोधात शिवसेनेकडून पोलीस तक्रार करण्यात येणार आहे. याबाबत शिवसेनेकडून अधिकृतरित्या ट्विटरवरून माहिती देण्यात आली आहे.
फर्जी और छेड़छाड़ की गई तस्वीरें ट्वीट करने के लिए हम पुलिस केस दर्ज कर रह हैं। वैसे तो हमें पता है कि झूठ बोलना और बदतमीजी करना बीजेपी के डीएनए में है। https://t.co/gpRsVesqi0
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) August 15, 2024
शिवसेनेच्या त्या पेजवरून तो फोटो शेअर करत तो कसा खोटा आहे याची पोलखोल करण्यात आली आहे. याबाबत ट्विट करत शिवसेनेने भाजपला फटकारले आहे. ”असे खोटे व बनावट फोटो ट्विट केल्याप्रकरणी आम्ही पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत. हे जरी करणार असलो तरी आम्हाला माहित आहे की खोटं बोलणं आणि भावनाशून्यपणा हा भाजपच्या रक्तातच आहे’, अशा शब्दात शिवसेनेने भाजपला फटकारले आहे.
उद्धव ठाकरे हे 6 ऑगस्ट रोजी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. तसेच उद्धव ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबीयांची देखील भेट घेतली.
भाजपाई गोबर भक्त पूरे दिन Fake Propognada फैलाते है!
झूठ की दुकान खोल रखी है! pic.twitter.com/FATeOvQOz6
— Manu🇮🇳🇮🇳 (@mshahi0024) August 14, 2024