लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्र धर्माचा जागर करण्यासाठी शिवसेनेची राज्यव्यापी वज्र निर्धार परिषद उद्या आयोजित करण्यात आली आहे. दादर येथील शिवाजी महाराज मंदिर सभागृहात दुपारी 12 वाजता या परिषदेला सुरुवात होणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
दोन सत्रांमध्ये ही परिषद होणार आहे. पहिल्या खुल्या सत्राचे अध्यक्षस्थान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे भूषवणार आहेत. विविध समाजघटकांसाठी कार्यरत असलेल्या संविधानप्रेमी, लोकशाहीवादी विचारांच्या सर्व स्वयंसेवी संस्था व सामाजिक संघटनांचे मान्यवर, तसेच विचारवंत, साहित्यिक आणि कलावंत मंडळी या वज्रनिर्धार परिषदेत सहभागी होणार आहेत. शिवसेना सचिव डॉ. संजय लाखे पाटील या परिषदेचे निमंत्रक आहेत.
स्थळ – शिवाजी मंदिर, दादर
वेळ – दु. 12 ते सायं. 5