नायगाव बीडीडी प्रकल्प वेळेत पूर्ण करा , खासदार अनिल देसाई यांनी केली पाहणी

दादरच्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरू असून त्याची खासदार अनिल देसाई यांनी बुधवारी जाऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि म्हाडा व एल अॅण्ड टीच्या अधिकाऱयांशी चर्चा केली. तसेच हा प्रकल्प वेळेत पूर्ण करा, आम्ही वेळोवेळी कामाचा आढावा घेऊ, असेही देसाई यांनी अधिकाऱयांना सांगितले.

या वेळी माजी महापौर श्रद्धा जाधव, माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ, विभाग संघटक राकेश देशमुख, सुनीता आयरे, उपविभाग समन्वयक प्रशांत घाडीगावकर, अॅड. रचना अगरवाल, युवासेना विभाग अध्यक्ष नीलेश बडदे, गीता दळवी, शाखाप्रमुख अभिषेक सावंत, वंदना मोरे, समन्वयक अभिषेक बासुतकर, राजेंद्र सोनावणे, प्रदीप कदम, अनिकेत संकपाळ आदी उपस्थित होते.