उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमध्ये निघाला विराट हंबरडा मोर्चा, मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा सुरू झाला आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला आणि पूग्रस्तांसाठी शिवसेनेने हा हंबरडा मोर्चा काढला आहे. क्रांतीचौकातून हा मोर्चा निघाला आहे. गुलमंडीवर मोर्चाचा समारोप होणार आहे. समारोपाच्या ठिकाणी शेतकरी मनोगत व्यक्त करणार आहेत. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे या मोर्चात सहभागी झाले आहेत. यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत.