जिथे शिवसेना जाते तिथे गुंडांची दहशत मोडून काढते! विरार-नालासोपारात उद्धव ठाकरेंची झंझावती सभा

1497

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी नालासोपारा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे उमेदवार प्रदीप शर्मा आणि वसई मतदारसंघाचे उमेदवार विजय पाटील यांच्या प्रचारार्थ विरार येथे प्रचार सभेत जनतेला मार्गदर्शन केले. यावेळी चिमाजी आप्पांच्या नगरीला दहशतीतून आणि गुंडगिरीतून मुक्त करण्यासाठी महायुतीच्या भगव्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले. वाचा उद्धव ठाकरे यांच्या झंझावती भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –

  • जिथे जिथे शिवसेना जाते तिथे गुंडाची दहशत आम्ही मोडून काढतो, हा शिवसेनेचा इतिहास आहे – उद्धव ठाकरे
  • आज सुद्धा कदाचित तुमच्या वस्त्यांमध्ये फोन येत असतील, मतदान नाही केलं तर पाणी तोडू, वीज तोडू. अरे हिंमत असेल तर करून दाखव, गाठ शिवसेनेशी आहे – उद्धव ठाकरे
  • आम्हाला गुंडांची गरज नाही, आमच्याकडे माता भगिनींच रक्षण करणारे शिवसैनिक वीर आहेत – उद्धव ठाकरे
  • जिथे हॉस्पिटलच नाही तिथे 1 रुपयात आरोग्य चाचणी देणार कशी? म्हणून सर्व जिल्ह्यांत मी एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा देणार आहे – उद्धव ठाकरे
  • काँग्रेस-राष्ट्रवादी तुम्ही आम्हाला विरोध करतात तर करा पण आम्हाला विरोध करताना तुम्ही बकासुराला निवडून देत आहेत – उद्धव ठाकरे
  • प्रदीपजी तुम्ही नुसते लोकप्रतिनिधी नाहीत, तर तुम्ही सर्वसामान्यांचे हे रक्षक आहेत पोलिस त्यांचे प्रतिनिधी आहात – उद्धव ठाकरे

  • आता तुमच्याकडे कोणी स्क्वेअर फुटांचा हिशोब घ्यायला आला तर त्यांना म्हणा चल फूट – उद्धव ठाकरे
  • ज्याच्या हातात भगवा आहे त्याला कोणालाही घाबरण्याची गरज नाही, अजिबात नाही – उद्धव ठाकरे
  • मी ज्या ज्या वेळी या विभागात आलो आहे किंवा या विभागातले कोणी मातोश्रीवर आले आहेत तेव्हा एकच मागणी केली आहे की साहेब कोणतरी आम्हाला कणखर द्या, आम्हाला यांची दादागिरी मोडून काढायची आहे – उद्धव ठाकरे

 

आपली प्रतिक्रिया द्या