शिवसेना-युवासेनेचा शनिवारी मोफत भव्य रोजगार मेळावा, 10 हजार 122 नोकऱयांची संधी! आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना-युवासेना शाखा क्रमांक 198 च्या वतीने गरजू युवक-युवतींसाठी भव्य आणि मोफत रोजगार मेळाव्याचे आयोजन शनिवारी करण्यात आले आहे. या मेळाव्यात 10 हजार 122 नोकऱ्यांची संधी मिळणार असून बेरोजगारांना थेट रोजगार देणारा हा उपक्रम ठरणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन शिवसेने नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

शनिवार, 28 मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत डिलाईल रोड येथील ना. म. जोशी मार्ग शाळा येथे हा मेळावा पार पडणार आहे. मेळाव्यात विविध नामांकित पंपन्यांचा मेळाव्यात राहणार आहे.

कोणत्या क्षेत्रातील नोकऱ्या

एफएमसीजी, टेलिकॉम, हॉस्पिटॅलिटी, बीपीओ, लॉजिस्टिक्स, सेल्स आदी क्षेत्रांतील शेकडो नोकरीच्या संधी यावेळी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

10वी, 12वी पास, पदवीधर तसेच पदव्युत्तर उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येणार असून फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.

“प्रत्येक घरात रोजगार’’

या उपक्रमाचे आयोजन युवासेना सहसचिव प्रथमेश बोभाटे आणि शाखाधिकारी नितीन शिरोडकर यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. “प्रत्येक घरात रोजगार’’ हा संकल्प डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

स्थळ – ना. म. जोशी मार्ग शाळा, डिलाईल रोड

वेळ – सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत

n मेळाव्यात सहभागी होण्यासाठी क्यूआर कोडद्वारे नोंदणी करण्याचे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Displaying rojgar-Gajajan.jpg