शिवसेनेच्या शिलेदारांचे अर्ज दाखल

महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीच्या १७शिलेदारांनी वाजतगाजत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये पनवेलमधील १, नवी मुंबईतील ७, कल्याण-डोंबिवलीतील २ उमेदवारांचा समावेश आहे. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील सर्वच महापालिकांमध्ये महायुती करण्यासाठी शिंदे गट आणि भाजपच्या जोरबैठका सुरू आहेत. अर्ज भरण्यासाठी एक दिवस उरलेला असतानाही युतीचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे युतीमधील इच्छुक चिंताग्रस्त असतानाच शिवसेनेच्या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज भरण्यात आघाडी घेतल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

नवी मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक २४ मधून शिवसेनेचे सतीश रामाणे यांनी आपला उमदेवारी अर्ज दाखल केला. याच प्रभागातून मनसेच्या भूमिका म्हात्रे यांनीही अर्ज दाखल केला आहे. प्रभाग क्रमांक २२ मधून मनसेचे अजित देसाई यांचाही अर्ज आज भरण्यात आला. याप्रसंगी मनसेचे शहरप्रमुख गजानन काळे, विभागप्रमुख प्रवीण धनावडे आदी उपस्थित होते.

ऐरोली मतदारसंघात प्रभाग क्रमांक ८ मधून शिवसेनेच्या मुक्ता मढवी, युक्ता म्हात्रे यांनी आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केले. मिलिंद पाटील यांनी प्रभाग ३ मधून तर माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे यांनी प्रभाग १० मधून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत मढवी आदी उपस्थित होते.

पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक १६ मधून शिवसेनेचे यतीन देशमुख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख शिरीष घरत, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, महानगरप्रमुख अवचित राऊत, तालुकाप्रमुख संदीप तांडेल, शहरप्रमुख प्रवीण जाधव उपस्थित होते.

कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. माने हे प्रभाग क्रमांक २७ मधून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मनसेचे योगेश पाटील यांनी प्रभाग क्रमांक ३० मधून उमेदवारी अर्ज भरला आहे.

मुंबईत मोदींना प्रचाराला यायची गरज काय? येथील भाजप नेते, मुख्यमंत्री प्रचाराला सक्षम नाहीत का? योगी आदित्यनाथ का येत आहेत प्रचाराला, काय संबंध आहे? इथलं वातावरण खराब करायचे आहे. आज कुणीतरी म्हटले की, मुंबईत फक्त ‘जय श्रीराम’ नारा चालेल. जय श्रीराम आमचे आदर्श आहेत, पण आम्ही मानतो की मुंबईत ‘जय महाराष्ट्र’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ नारा चालेल.