आमची नाराजी कायम; माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पक्षश्रेष्ठींकडे अहवाल जात नाही आि दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आमची नाराजी कायमच आहे, अशी स्पष्टोक्ती भाजपाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाजप कोअर कमिटीची बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, मुंबई येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आम्ही सर्वजण एकत्रितपणे चर्चा केली आहे. आमची नाराजी आम्ही पक्षाकडे व्यक्त केली आहे. आमचा पराभव कशामुळे झाला? का झाला ही वस्तुस्थिती आम्ही आम्ही पक्षासमोर मांडली आहे. त्यांनी आमची भूमिका समजून घेतली आहे. दोन महिन्यांमध्ये स्वतंत्रपणे कमिटी नेमून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करू, असे आश्वासन आम्हाला दिले आहे. मात्र, अहवाल येऊन दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आमची नाराजी कायम असल्याचे कार्डीले यांनी सांगितले. आम्ही नाराज आहोतच. आमची नाराजी दूर झालेली नाही. नाराजी केव्हा दूर होईल असे विचारल्यावर अहवाल आल्यानंतर जो काही निर्णय पक्ष घेईल, त्यानंतर कारवाई झाल्यानंतरच नाराजी दूर होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.