या महिलेला मिळाला नौदलाची पहिली महिला वैमानिक होण्याचा मान

801

हिंदुस्थानच्या सैन्य दलात अजून एका महिला सैनिकाने इतिहास रचला आहे.  सब लेफ्टनंट शिवांगी स्वरूप या हिंदुस्थानी नौदलातील पहिल्या महिला वैमानिक बनल्या आहेत. सोमवारी त्या कोची नौदल तळावर ऑपरेशनल ड्युटीमध्ये रुजू झाल्या आहेत.

नौदलातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवांगी हिंदुस्थान एयरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)ने तयार केलेल्या ड्रोनिअर 228 या विमानाचं उड्डाण करणार आहेत. हे विमान कमी अंतराच्या सागरी मिशनवर पाठविले जाते. त्यात अ‍ॅडव्हान्स रडार, इलेक्ट्रॉनिक सेन्सर आणि नेटवर्किंग सारख्या बर्‍याच उत्कृष्ट वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या वैशिष्ट्यांच्या मदतीने हे विमान हिंदुस्थानी समुद्री भागावर नजर ठेवेल.

नौदलातील प्रथम महिला वैमानिक बनल्यानंतर सब लेफ्टनंट शिवांगी म्हणाल्या, ‘मी बऱ्याच काळापासून या दिवसाची वाट पाहत होते. आज तो क्षण आला आहे. मला खूप छान वाटतंय. मी आता तिसर्‍या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी मेहनत करणार आहे.’ नौदलाआधी हिंदुस्थानी हवाई दलात तीन महिलांची लढाऊ वैमानिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग या तीन महिलांना हा मान मिळाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या