शिवभोजन थाळी उपक्रमाचा रत्नागिरीत पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

217

राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री अॅङ अनिल परब यांच्या हस्ते शिवभोजन आहार योजनेंचा शुभांरभ जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे आज झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, जिल्हा परिषद रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले की,गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात भोजन मिळावे यासाठी शासनाने शिवभोजन आहार योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. रत्नागिरी येथे जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालय, हॉटेल मंगला, एसटी बस स्थानक जवळ आणि रेल्वे स्टेशन, रत्नागिरी अशा ठिकाणी नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. प्रत्येक ठिकाणी 100 थाळी दुपारी 12.00 ते 02.00 या वेळेत उपलब्ध होणार असून या शिवभोजन थाळीची किंमत फक्त रु. 10/- प्रती थाळी राहणार आहे. गरीब, गरजू, सर्वसामान्य व्यक्तींची भूक शमविण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या