
सामना ऑनलाईन । पुणे
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यातील लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिरात चक्क्यापासून भव्य महादेवाची पिंडी साकारण्यात आली आहे. ही पिंडी साकारण्यासाठी तब्बल 101 किलोचा चक्का वापरण्यात आला आहे. तसेच या पिंडीला सुकामेवा आणि विविध फुलांनी सजावट करण्यात आली आहे.
पुण्यातील लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिरातील आकर्षक शिवलिंग सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. चक्क्यापासून बनवलेल्या या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भावीक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. मंगळवारी या चक्काचा महाप्रसाद बनवून तो भाविकांना दिला जाणार आहे.





























































