श्री क्षेत्र शिवपुरी दत्तमंदिर (राजस्थान)

>> निळकंठ कुलकर्णी

श्री गुरुदेव दत्त

गुरुताई सुगंधेश्वर यांनी शिवाची व दत्तात्रेयांची उपासना दृढ व्हावी म्हणून इंटाली खेडा ( राजस्थान ) येथे एक दत्तमंदिर बांधले. 1980 साली हे सद्गुरू वामन – दत्तमंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. या मंदिरात दत्तमूर्ती सुरेख आहे. दत्तमंदिरात पुढे अनेक सोयी निर्माण झाल्या. गुळवणी महाराजांचा आशीर्वाद पाठीशी होताच. एकलिंगजी व दत्तप्रभूं याच्या भक्तीचा प्रसार या स्थानातून सर्वत्र होत आहे. मंदिरात गुळवणी महाराजांची तसबीर आहे. सकाळ संध्याकाळ पूजा, आरती, जप नित्यनेमाने होत असतो. प्रसंगी होमहवनही होते.

या मंदिराच्या शेजारी 1992 साली अष्टभुजा अंबामातेची मूर्ती स्थापन झाली. अन्नपूर्णा नावाचे एक स्वयंपाकघरही तयार झाले. इंटाली खेडा येथील शिवपुरीचे महत्व सर्व राजस्थानात पसरले. या देवस्थानाच्या काही योजना आहेत. केंद्र सरकारद्वारे मान्यता असलेले एक सेंटर पब्लिक स्कुल चालवण्याची योजना आहे. प्रासादेमामा यांचे एक हॉस्पिटल त्यात आहे. उद्योगभुवन, कार्यशाळा यांचीही निर्मिती होणार आहे. अध्यात्माचा एक महत्वाचा विभाग सुरू आहे. त्याशिवाय एक वृद्धाश्रम सुरू करण्याचा विचार आहे.

दत्तभक्तीमध्ये नुसती देवपूजा नसून लोकांचे आरोग्य व शिक्षण यांनाही महत्व या केंद्रामध्ये दिले जाते. वासुदेवानंदसरस्वती, रंगावधुत यांनी गुजरातमध्ये जसा दत्तभक्तीचा प्रसार केला. त्याचप्रमाणे गुरुताई सुगंधेश्वर यांनी राजस्थानात हा प्रसार केला.

([email protected])

आपली प्रतिक्रिया द्या