शिवसेनेच्या दहीहंडी सराव शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शीव-कोळीवाडा विधानसभा विभाग क्र. 9 च्या वतीने देवी बर्नावास मनोरंजन उद्यान येथे आयोजित दहीहंडी सराव शिबिराला गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गोविंदा पथकांनी रचलेले चित्तथरारक मानवी मनोरे पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. सराव शिबिरात सहभागी झालेल्या गोविंदा पथकांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

शीव-कोळीवाडा विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार यांनी या सराव शिबिराचे आयोजन केले होते. विभागप्रमुख प्रमोद शिंदे, विभाग संघटक पद्मावती शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज हेगिष्टे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. विधानसभा समन्वयक रवी परब, उपविभागप्रमुख दत्ता भोसले, विनायक तांडेल, राजेश कुचिक, विधानसभा समन्वयक रणजीत चोगले, माजी नगरसेवक रामदास कांबळे, स्मिता गावकर, प्रणिता वाघधरे, शारदा गोळे, युवासेनेचे युवा विभाग अधिकारी ऋषी नेळगे यांच्यासह शाखाप्रमुख, शाखा संघटक, युवासेनेचे पदाधिकारी, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शिव आरोग्य सेनेच्या वतीने घाटकोपर,चेंबूर परिसरामधील गोविंदा पथकातील सदस्यांना टी-शर्टचे वितरण करण्यात येणार आहे. शिवसेना भवन येथे या टी-शर्टचे उद्घाटन करताना शिवसेना उपनेते  रवींद्र मिर्लेकर, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक, दगडू सकपाळ, शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र सकपाळ दिसत आहेत. यावेळी मुंबई पूर्व उपनगर सह समन्वयक प्रकाश वाणी, घाटकोपर संघटक सचिन भांगे, सचिन पारसनाईक, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे गिरीश विचारे उपस्थित होते.