
पालघर जिह्यातील ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्र घरत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 70 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई, भाऊ, बहीण, नातवंडे असा परिवार आहे.
शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर तरुण वयातच राजेंद्र घरत यांनी शिवसेनेच्या कार्यात झोकून दिले. धनसार गावातील गोरगरीबांचे आधारवड होते. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांनी सदस्य म्हणून अनेक प्रश्न मार्गी लावले. पालघर जिह्यात तळागाळात शिवसेना रुजवण्याचे काम त्यांनी केले. धनसार गावचे सरपंच पदही त्यांनी भूषवले. शिवसेनेचे पालघर तालुकाप्रमुख म्हणून त्यांची कारकीर्द महत्त्वपूर्ण ठरली.




























































