खैरे तुम्ही जिगरबाजपणे लढलात, उद्धव ठाकरे यांनी दिला धीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर 

‘खैरे काळजी करू नका. तुम्ही जिगरबाजपणे लढलात’, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धीर दिल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आज सांगितले. लोकसभा निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत चंद्रकांत खैरे अवघ्या साडेचार हजार मतांनी पराभूत झाले. सलग पाचव्यांदा विजयी होऊन संभाजीनगरच्या राजकारणात इतिहास घडविण्याची संधी थोडक्यात हुकली. खैरे यांचा हा निसटता पराभव शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला. माझ्या पराभवाची माहिती आणि कारणमीमांसा करण्यासाठी मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. तेव्हा त्यांनी ‘खैरे काळजी करू नका. तुम्ही जिगरबाजपणे लढलात’ अशा शब्दांत धीर दिल्याचे खैरे यांनी पत्रकारांना सांगितले.