राममंदिराची पहिली वीट रचण्यास शिवसैनिकांनी सज्ज राहावे, उद्धव ठाकरे यांचे आवाहन

2285
uddhav thackeray

न्यायालयाचा निर्णय जो लागायचा तो लागेल, पण ज्या हिमतीने सरकारने 370 कलम हटवले त्याच हिमतीने अयोध्येत राममंदिराची उभारणी सुरू करावी, असे ठाम मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. ‘मातोश्री’वर शिवसेना पदाधिकार्‍यांच्या बैठकीदरम्यान त्यांनी राममंदिरासंदर्भात शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

सर्वोच्च न्यायालयात अयोध्या व राममंदिरासंदर्भात रोज सुनावणी सुरू असून कोणत्याही क्षणी निकाल अपेक्षित आहे. ‘‘शिवसेनेने राममंदिरासंदर्भात केलेला संघर्ष व गेल्या वर्षभरात राममंदिराप्रश्नी शिवसेनेने लावलेला ‘रेटा’ यामुळे सकारात्मक गोष्टी घडत आहेत व राममंदिर निर्माणकार्य कोणीच रोखू शकत नसल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

‘बाबरी’ पाडणारे व त्यात हौतात्म्य पत्करणारे शिवसैनिकच होते, याची आठवण करून देत गेल्या वर्षभरात आपण दोन वेळा अयोध्येत जाऊन राममंदिर प्रश्नावर जाग आणल्याचेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

‘अयोध्या’ आंदोलनात शिवसेनेचे योगदान अमूल्य आहे व देशाने त्याची दखल घेतली आहे. राममंदिराची पहिली वीट रचण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या