शिवसेना उपनेते माजी आमदार, माजी महापौर अनंत तरे यांचे निधन

शिवसेना उपनेते माजी आमदार, माजी महापौर अनंत तरे यांची महिन्याभरापासून प्रकृती खालावली होती. ज्युपिटर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 66 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अनंत तरे यांनी 3 वेळा ठाण्याचे महापौरपद , विधान परिषदेचे सदस्यपद भूषविले होते. एकविरा देवस्थान ट्रस्ट, कार्ला तसेच अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी दुपारी 2 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या