
सामना प्रतिनिधी । मुंबई
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष शिवसेना नेते-खासदार गजानन कीर्तिकर, कार्याध्यक्ष शिवसेना नेते-खासदार आनंदराव अडसूळ, सरचिटणीस शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची महत्त्वाच्या विषयावर अत्यंत तातडीची बैठक सोमवार, 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. शिवसेना भवन, दादर येथे होणाऱया या बैठकीला महासंघाचे सर्व पुरुष-महिला पदाधिकारी, संलग्न समितींचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.



























































