पुसद मध्ये शिवसेनेचे प्रथम ‘ती’ महिला संमेलन उत्साहात

880
shivsena-logo-new

 शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रेरणेतून महिला सक्षमीकरणासाठी प्रथम ‘ती’ महिला मेळावा शिवसेनेतर्फे शुक्रवार २० सप्टेंबर रोजी पुसद येथे उत्साहात पार पडला. या संमेलनासाठी मुंबईवरुन आलेल्या महिला पाहुण्यांचे ढोलताशाच्या गजरात स्थानिक शिवसेना महिला संघटनेच्या महिलांनी स्वागत केले. या संमेलनात महिला सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

या संमेलनात खासदार भावनाताई गवळी, कामिनी शेवाळे  विना भागवत, संध्या दोशी, यवतमाळ जिल्हा महिला संघटिका लता चंदेल यांनी शिक्षण, समता, सुरक्षा, स्वावलंबन व स्वास्थ्य या पाच विषयांवर महिलांना मार्गदर्शन केले. उध्दव ठाकरे यांच्या महिलां विषयीच्या भावना महिलांपर्यंत पोहविल्या. यावेळेस खासदार भावनाताई गवळी यांना आशा महिला कर्मचार्‍यांनी त्यांच्या मागणीचे निवेदन दिले. या महिला संमेलनाचे संचलन सुचिता तुंडलवार, स्वाती सुने, मेघा पापीनवार यांनी केले. या संमेलनात शहर व तालुक्यातील अनेक महिला उपस्थित होत्या. आभार प्रविणा पापीनवार यांनी मानले.

आपली प्रतिक्रिया द्या