राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शिवसेनेची राज्यपालांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना मदत करावी अशी मागणी शिवसेनेने राज्यपालांकडे केली आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तेव्हा मागणीचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले.

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळबागा नष्ट झाल्या आहेत. वादळामुळे मच्छीमारांच्या नोकांचेही नुकसान होऊन मासेमारी ठप्प झाली आहे. त्यामुळे त्यांना आधार देण्यासाठी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेनेने राज्यपालांकडे केली आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकरी आणि मच्छीमारांना सर्वतोपरी सहाय्य करावे असेही शिवसेनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.