राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेकडून 2023-24 या वर्षासाठी महाराष्ट्र विधानपरिषदेतील उत्कृष्ट भाषणासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
विधिमंडळाच्या कामकाजातील नियमित सहभाग, विधिमंडळाच्या नियमांचे काटेकोर पालन, विधिमंडळात उपस्थित करावयाच्या विषयांचे आकलन, उपस्थिती, विषय मांडताना वापरलेले ज्ञान, निवडलेले मुद्दे, वत्तृत्व शैली, उत्कृष्ट भाषणे या सर्व गोष्टी पडताळून पाहून पुरस्कारांसाठी नेमलेल्या तज्ञ समितीकडून उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण यासाठीच्या पुरस्कारांची शिफारस केली जाते. त्यानुसार राष्ट्रकूल संसदीय मंडळाकडून हे पुरस्कार जाहीर केले जातात. यंदा 2018-19 ते 2023-24 पर्यंतचे पुरस्कार एकाचवेळी जाहीर केले आहेत. त्यात सुनील शिंदे यांचीही उत्कृष्ट भाषणासाठीच्या पुरस्कारासाठी निवड झाली असून उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात या पुरस्कारांचे वितरण होईल.