लफंगेगिरी, कटकारस्थान, षड्यंत्राला हिंदुत्वात स्थान नाही! संजय राऊत यांचे भाजपवर टीकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात विरोधी पक्षाकडून ज्या प्रकारचा खोटेपणाचा कळस उभारला जातोय. ज्या प्रकारे महाविकास आघाडीतील नेत्यांची यथेच्छ बदनामीची मोहीम राबविली जातेय. ज्या प्रकारचे कटकारस्थान, षड्यंत्र रचले जातेय, ज्या प्रकारची लफंगेगिरी राजकारणात सुरू आहे त्याला हिंदुत्वामध्ये स्थान नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर शरसंधान केले.

पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, सध्या विरोधी पक्षाचे असे आहे की खोटे बोला पण रेटून बोला, पण मी इतकेच सांगेन की सहजतेने खरे बोला, खरे बोलण्यासाठी रेटून बोलायची गरज लागणार नाही.

भाजप नेत्यांची नावे असलेल्या डायऱयांचे काय झाले

यशवंत जाधव यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, शिवसेनेते डायरी लिहिण्याची परंपरा नाही. डायरी हा पुरावा असू शकत नाही. खोटय़ा डायऱया तयार केल्या जाऊ शकतात. देशाच्या राजकारणातील दोन किंवा तीन डायऱया आम्हाला माहिती आहेत. या डायरींमध्ये गुजरातपासून ते इतरांपर्यंत कोटय़वधी कोणाला मिळाले याच्या नोंदी होत्या. त्याची सीबीआय चौकशी झाली होती. तेव्हा सीबीआयने अशा डायऱया विश्वास ठेवण्यायोग्य नसतात असं सागितलं होतं. भाजपा नेत्यांची नावं त्यात होती, सुप्रीम कोर्टातही हे टिकलं नव्हतं. मग आमच्या लोकांचा उल्लेख करून डायरीबद्दल का सांगितलं जात आहे, असा सवाल संजय राऊत यांनी केला.