महिलांच्या सुरक्षिततेसाठी शिवसेनेचा पुढाकार

366

हैदराबाद व उन्नाव येथील घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. अशा घटना पुण्यात घडू नये याची खबरदारी घेतली पाहिजे. या हेतूने हडपसर व वानवडी परिसरातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे व शिवसैनिक यांच्या पुढाकारातून चारचाकी वाहन व सुरक्षारक्षकाची व्यवस्था करण्यात आली आहे. महिला सुरक्षेसाठी हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी सांगितले.

नगरसेवक नाना भानगिरे व वानवडी पोलीस ठाण्याच्या संकल्पनेतून महिलांसाठी रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत चारचाकी गाडी व सुरक्षारक्षक यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील व स्थानिक महिलांच्या हस्ते करण्यात आले. आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेत काम करण्याची संधी ज्या माता भगिनींनी दिली त्यांना मूलभूत सुविधांबरोबरच सुरक्षितता देणे ही आमची जबाबदारी आहे. त्यासाठी प्रभागात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरुवात केली आहे. महिला रात्री अपरात्री कामाहून परतत असताना त्यांना सुरक्षित घरी पोहचविण्यासाठी शिवसेनेच्या वतीने चारचाकी गाडी व सुरक्षारक्षक यांची व्यवस्था करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विचार पुढे नेणारे शिवसैनिक माता भगिनींना सुरक्षित वातावरण देतील, असा विश्वास नाना भानगीरे यांनी व्यक्त केला. यावेळी मीनाताई बाबर, मीनाताई बेडगे शिवसेना पदाधिकारी, नागरिक, महिला व सहजीवन जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व हांडेवाडी, हडपसर परिसर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या