गेल्या पाच दशकांहून अधिक काळ मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा श्वास आणि ध्यास बनून राहिलेला शिवसेनेचा दसरा मेळावा आज शिवतीर्थावर मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात होणार आहे. हा केवळ शिवसेनेचा मेळावा नाही, तर महाराष्ट्राच्या तेजस्वी परंपरेचा सोहळा आहे. या सोहळ्यासाठी शिवसैनिकांनी शिवतीर्थावर गर्दी केली आहे.