कानपुरात आयआयटीच्या विद्यार्थिनीवर एसीपीचा बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील कानपूर आयआयटीमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीवर पोलीस अधीक्षकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोहसीन खान असे पोलीस अधीक्षकांचे नाव असून पोलीस प्रशासनाने त्यांना तडकाफडकी पदावरून हटवले. प्रेमाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलीस आयुक्तांनी आरोपीविरुद्ध बलात्कारासारख्या गंभीर कलमा अंतर्गत अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.