बेस्टने शासनाकडे 950 कोटींची मागणी केली असता आम्ही फक्त 54 कोटी देणार असल्याचे शासनाने सांगितले. त्यावरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मिंधे-भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. शिवाय मग बेस्ट आर्थिक तोट्यातून बाहेर येणार कशी असा संतप्त सवाल शिवसेनेने शेअर केलेल्या एक्स पोस्टमध्ये केला आहे.
मिंधे- भाजपकडून बेस्टची थट्टा सुरुच!
आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्ट ने शासनाकडून ९५० कोटी मागितले असता, आम्ही फक्त ५४ कोटी देऊ असं म्हणणाऱ्या शासनाने बेस्टची थट्टा चालवली आहे. कॉन्ट्रॅक्टर मित्रांसाठी राज्याची तिजोरी खाली करणाऱ्या मिंधे- भाजप सरकारला बेस्टची आर्थिक स्थिती दिसत… pic.twitter.com/d8kX0B2UFh
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 30, 2024
शिवसेनेने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मिंधे- भाजपकडून बेस्टची थट्टा सुरुच आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्ट ने शासनाकडून 950 कोटी मागितले असता, आम्ही फक्त 54 कोटी देऊ असं म्हणणाऱ्या शासनाने बेस्टची थट्टा चालवली आहे. कॉन्ट्रॅक्टर मित्रांसाठी राज्याची तिजोरी खाली करणाऱ्या मिंधे- भाजप सरकारला बेस्टची आर्थिक स्थिती दिसत नाही का? असे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने म्हटले आहे.