नांदेड विमानतळावर उद्धव ठाकरे यांचे उत्स्फूर्त स्वागत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे दोन दिवसाच्या मराठवाड्या दौऱ्यावर आले आहेत. येथील जनसंवाद दौर्‍यासाठी दुपारी त्यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले. त्यांचे नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. त्यांच्यासोबत शिवसेना नेते खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, राज्य संघटक एकनाथ पवार आदी मान्यवर होते.

नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांच्या दोन दिवसाच्या दौर्‍यासाठी उध्दव ठाकरे यांचे दुपारी नांदेड विमानतळावर आगमन झाले. त्यांचे नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. विमानतळावर आगमन झाल्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है, जय भवानी, जय शिवाजी या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.