शिवसेनेचे राज्यमंत्री शंभूराज देसाई गटाची पाटण तालुक्यात सरशी

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल जाहीर झाला आहे. गावपातळीवर अनेक ठिकाणी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्रितपणे लढली आहे. पाटण तालुक्यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनने भरारी घेतली आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींत शंभुराज देसाई गाटची सरशी झाली आहे. तर पाटणकरांची पिछेहाट झाली आहे.

पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गटाच्या पॅनेलने सर्वाधिक ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे. तर विरोधी गटाचे सत्यजितसिंह पाटणकर यांच्या गटाची पिछेहाट झाली आहे. मंत्री शंभूराज देसाई यांच्या स्थानिक गटाने 41 ग्रामपंचातींवर वर्चस्व मिळवित सत्ता मिळविली आहे. तर विरोधी गटाची केवळ 20 ग्रामपंचायतीत सत्ता आली आहे. पाटण तालुक्यात 107 ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. यामध्ये 35 ग्रामपंचायती बिनविरोध आल्या. प्रत्यक्षात 72 ग्रामपंचायतीत निवडणूक झाली.

ग्रामपंचायतींचे निकाल

गृहमंत्री शंभूराज देसाई (शिवसेना) गट – 41, पाटणकर गट – 20, महाविकास आघाडी – 2, राष्ट्रवादी – भाजप – 1, राष्ट्रीय काँग्रेस – 1, समान – 7

मंत्री शंभूराज देसाई गट – मुळगाव, कोकिसरे, गोकुळ तर्फ पाटण- सत्तांतर, पेठ शिवापूर, चोपडी, त्रिपुडी – सत्तांतर, शिंदेवाडी, सोनवडे, वाटोळे – सत्तांतर, हुंबरळी- सत्तांतर, चोपदारवाडी, मणदुरे, आंबळे, वाडीकोतावडे, धावडे, दिवशी खुर्द-सत्तांतर, कातवडी- सत्तांतर, मुंद्रुळहवेली-सत्तांतर, ठोमसे-सत्तांतर, कसणी, कोरीवळे-सत्तांतर, बाचोली, मुरुड- सत्तांतर, चव्हाणवाडी, मस्करवाडी, बोडकेवाडी, मालोशी-सत्तांतर, मोरेवाडी, उमरकांचन-सत्तांतर, बाबंवडे, जानुगडेवाडी, पवारवाडी, शिद्रुकवाडी, धामणी- सत्तांतर, काढणे, काळगाव, हावळेवाडी, मानेवाडी – सत्तांतर, खोनोली, निगडे, चव्हाणवाडी (धामणी)

पाटणकर गट – काळोली, मेंढेघर, तामकडे, नेचल, सुळेवाडी-सत्तांतर, मेंढोशी, चिटेघर, साखरी, डोंगळेवाडी, टोळेवाडी, नावडी- सत्तांतर, सोनायचीवाडी, शिंगणवाडी- सत्तांतर, पापर्डे-सत्तांतर, कोचरेवाडी, केळोली, कुटरे, चिखलेवाडी, करपेवाडी – सत्तांतर कामरगाव.

राष्ट्रीय काँग्रेस – कुंभारगाव, राष्ट्रवादी – भाजप तारळे.

समान – पाठवडे, काहीर, पिपंळोशी, सुपगडेवाडी, चाफोली, कवडेवाडी, बोंद्री.

महाविकास आघाडी – गुढे, खळे.

आपली प्रतिक्रिया द्या