महापालिका रणसंग्राम, नगरमध्ये शिवसेना तर धुळ्यात भाजप

14

सामना प्रतिनिधी, मुंबई

नगर महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला असून शिवसेनेने सर्वाधिक 24 जागांवर विजय मिळवला आहे. तर धुळे महापालिकेत भाजपचे कमळ फुलले आहे. भाजपने 51 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. नगरमध्ये भाजप खासदार दिलीप गांधी यांना तर धुळ्यात ‘लोकसंग्राम’चे भाजप आमदार अनिल गोटे यांना मतदारांनी जबर झटका दिला आहे.

पक्षीय बलाबल
नगर महापालिका
शिवसेना -24
राष्ट्रवादी -18
भाजप -14
काँगेस -05
बसपा -04
सपा -01
अपक्ष -02

धुळे महापालिका
भाजप -50
राष्ट्रवादी -08
काँगेस -06
समाजवादी -02
एम.आय.एम. -04
शिवसेना -01
बसपा -01
लोकसंग्राम -01
अपक्ष -01

आपली प्रतिक्रिया द्या