युवासेनेचा अन्नदानाचा यज्ञकर्म सुरूच, गरजूंसाठी केली अन्नपाण्याची सोय

354

कोरोना व्हायरसचे संकट गंभीर असले तरी नागरिकांच्या पाठीमागे शिवसेना युवासेना खंबीरपणे उभी आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २२ तारखेपासून संभाजीनगरात अन्नदान व इतर उपयुक्त वस्तूंचा पाठपुरावा शिवसैनिक आणि युवासैनिक करत आहेत.

रविवारी शिवसेना, युवासेनेच्या वतीने आपल्यासाठी 24 तास ड्युटीवर कार्यरत असलेल्या पोलीस बांधवांना पाण्याचे बॉक्स, टिफिन बॉक्स, मनपा कर्मचारी यांना सॅनिटायझर, जेवण, तसेच सातारा परिसरात गरजूंना अन्नदान करण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हा युवाधिकारी ऋषिकेश खैरे, ऍड. आशुतोष डंख, उद्योजक नितीनकाका घोगरे, युवासेना शहर अधिकारी मिथुन व्यास, रणजित ढेपे, शाखाप्रमुख रामेश्वर पेंढारे, संतोष कांबळे, सुनील दायमा यांची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या