‘वो कौन है-एक मर्डर मिस्ट्री’च्या चित्रीकरणाला सुरुवात

सामना ऑनलाईन । मुंबई

आपल्या वाढदिवसादिवशीच नव्या कोऱ्या चित्रपटाची घोषणा करणारे निर्माते पी. अभय कुमार यांनी त्यांच्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले आहे. ‘वो कौन है-एक मर्डर मिस्ट्री’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संदीप कुमार पांडे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

नुकताच वो कौन है-एक मर्डर मिस्ट्री या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ झाला. यावेळी दिग्दर्शक डी.के.बर्नवाल, संगीत दिग्दर्शक संजय राज, अरूण बक्षी, विजू खोटे, विजय कदम, मुकेश तिवारी, विजय पाटकर, वृषाली गोसावी, अपूर्वा कवडे, निखील परमार, अबू मलिक आदी कलाकार उपस्थित होते.

पी. अभय कुमार यांनी आजवर अनेक चित्रपट निर्माण केले आहेत. लघुपट बनवण्यातही अभय कुमार अग्रेसर असतात. क्राईम, विनोदी, भयपट, ड्रामा, रोमान्स अशा विविध विषयांवर त्यांनी आजवर चित्रपट बनवले आहेत. यू ब्लडी फूल, बद्रीनाथ एलएलबी, टीट फॉर टॅट 2, लव्हर बॉय, ब्लाईंड लव्ह अशी कित्येक कलाकृती त्यांनी एसपी फिल्म्स अंतर्गत सादर केली आहेत. त्यामुळे पी. अभय कुमार हे त्यांच्या नव्या चित्रपटासाठीही फार उत्सुक आहेत.