कर्नाटकात चार राज्यातील नागरिकांना बंदी, दुकाने आणि वाहतूक सुरू राहणार

1442

कर्नाटकमध्ये चार राज्याती नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच राज्यात बस आणि ट्रेन सेवा रविवार वगळता सुरू राहणार आहेत. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.


केंद्र सरकारने नवीन नियम आणि शर्तींसह लॉकडाऊन वाढवला होता. त्यानुसार कर्नाटक राज्यात महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तमिळनाडूतील नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. 31 मे पर्यंत ही बंदी असून राज्यात दुकाने उघडण्यासही परवानगी दिली आहे. रविवारी सोडून ही दुकाने सुरू राहतील. फक्त कंटेनमेंट झोनमध्ये दुकाने बंद राहतील. संपूर राज्यात शासकीय आणि खासगी बस सेवा सुरू राहतील.


कर्नाटकात आतापर्यंत 1100 हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 30 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या