
उन्हाळ्याच्या सुट्टीत सहकुटुंब देवदर्शनासाठी बाहेर पडणाऱया भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात उद्या, बुधवारपासून ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तोकडे कपडे घालून भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी येऊ नये. पारंपरिक किंवा पूर्ण अंग झाकले जाईल असेच कपडे घालून यावे, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने केले आहे. मंदिरात धार्मिक वातावरण, पावित्र्य आणि परंपरा जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचेही समितीने म्हटले आहे.