Short News – मराठा मंदिरमध्ये शिवरायांचा जयंती उत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा मंदिर या संस्थेतर्फे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार गेली 61 वर्षे साजरा केला जात आहे.  या वर्षी जन्मोत्सव शुक्रवार, 6 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजता  जिवाजीराव महाराज शिंदे सभागृह, दुसरा मजला, मराठा मंदिर चित्रपटगृह, मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेंट्रल येथे होणार आहे. यावेळी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन शैलीचे गाढे अभ्यासक व लेखक डॉ. अजित वामन आपटे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज व आधुनिक व्यवस्थापन’  या विषयावर व्याख्यान होईल. जास्तीत जास्त शिवप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा मंदिर संस्थेने केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क  66044150 / 9324942377.

मातृभाषा सन्मान मराठी पुरस्कारासाठी आवाहन

नारायण देसाई फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘मातृभाषा सन्मान पुरस्कार सोहळा / मराठी चित्रपट महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.  या मराठी चित्रपट महोत्सवात 1 जानेवारी 2024 ते  31 डिसेंबर 2025 या कालावधीत  प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट सहभागी होऊ शकतात. इच्छुक निर्माते, दिग्दर्शक व संबंधितांनी आपले प्रवेश अर्ज 30 मार्च 2026 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सिनेपत्रकार, जीवन गौरव, विशेष योगदान, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सामाजिक चित्रपट, विनोदी चित्रपट, दिग्दर्शक, कथा, पटकथा, संवाद, अभिनेता, अभिनेत्री, विनोदी/सहाय्यक अभिनेता, विनोदी/सहाय्यक अभिनेत्री, छायांकन, संकलन, रंगभूषा, संगीतकार, गीतकार, पार्श्वगायक, पार्श्वगायिका, कला दिग्दर्शक, पार्श्वसंगीत, बाल कलाकार तसेच पदार्पण (दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री) अशा विविध  पुरस्कारांनी   मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा मे महिन्यात होईल. अधिक माहितीसाठी संपर्क 9987652250 / 8108889100.