थोडक्यात बातमी: मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षा 18 मार्चपासून, टेम्पोच्या धडकेत मुलीचा मृत्यू

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील विविध विद्याशाखेअंतर्गत होणाऱया परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पदवी स्तरावरील बी.कॉम. सत्र 6 अभ्यासक्रमाची परीक्षा 18 मार्च, बी.एस्सी. सत्र 6, बी.एस्सी. माहिती व तंत्रज्ञान सत्र 6 आणि बी.ए सत्र 6 परीक्षा 26 मार्च 2025 पासून सुरू होणार आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित विषयांची परीक्षा 18 मार्च, तसेच बीएमएम आणि बीएएमएमसी सत्र 6 परीक्षा 26 मार्चपासून घेण्याचे विद्यापीठाने नियोजित केले आहे.

टेम्पोच्या धडकेत मुलीचा मृत्यू

मोटरसायकल स्लिप झाल्याने झालेल्या अपघातात दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी परळ परिसरात घडली. श्रावी मनोज पवार असे मृत मुलीचे नाव आहे. तिचे वडील आणि आईदेखील जखमी झाले आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी टेम्पोचालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. वर्षाचा पहिला दिवस असल्याने मनोज हे पत्नी आणि मुलीसोबत फिरण्यासाठी भायखळय़ाच्या राणीच्या बागेत जात होत होते. आज सकाळी ते तिघे मोटरसायकलने भायखळ्याच्या दिशेने जात होते. नरे मैदान रोड दक्षिण वाहिनीवरून जाताना हा अपघात झाला.